एक embarrassing प्रसंग:
चारपाच वर्षांपूर्वी मी ज्या कंपनीत काम करायचो, त्या कंपनीने ऑस्ट्रेलिया मधली एक कंपनी acquire केली होती. माझा प्रोजेक्ट तसा मोठा होता. आणि भारतातून पुणे आणि बंगलोर अशा दोन ठिकाणच्या आणि एक आमच्याच कंपनीची ऑस्ट्रेलियातील एक अशा तीन teams काम करत होत्या. ऑस्ट्रेलियन team मध्ये स्वरूप नावाचा एक मराठी मुलगा होता. निंदेच्या सोयीसाठी त्याचे आडनाव देशपांडे म्हणू. नको आडनावाची तशी गरज पडणार नाही. त्याला स्वरूप म्हणूया. आणि तो देशपांडे आडनाव नसलेला पण महाराष्ट्रीय ब्राह्मण होता असे म्हणू.
स्वरूप जन्मापासून तिकडेच राहिलेला. मला वाटतं तिथल्या एक मराठी मुलीशी लग्न ठरलं होतं त्याचे. पण लग्न भारतात होतं. म्हणून तो भारतात आला होता. मग भारतात आला तर मग आमच्या team मध्येच join झाला. आणि महिनाभर काम केले. मग लग्नासाठी सुट्टीवर गेला. या मधल्या काळात त्याच्याशी बोलण्याचा एकदाही प्रसंग आला नाही. आता team खूप मोठी होती वगैरे आहे. पण मी तसा स्वतःहून त्याच्याशी नाही बोलायचो. तोदेखील कधी बोलला नाही. मी बऱ्याचदा ठरवायचो की आज त्याच्याकडे जाऊन माझे काही काम नसले तरी बोलूया. पण आज उद्या करता करता एकदाही बोलणे झाले नाही. प्रोजेक्ट एकच असला तरी मोड्यूल्स वेगवेगळे होते.
दुसरे असे की तो मराठी कधीच बोलला नाही. आयुष्यभर तिकडे राहिल्यामुळे त्याचा English बोलतानाचा accent पूर्ण तिकडचा होता. अशावेळी त्याचे मराठी ऐकायची मला जरा उगीच इच्छा होती. पण तसा प्रसंग नाही आला. मग तो लग्नासाठी सुट्टीवर गेला आणि नंतर ऑस्ट्रेलियाला.
मग ४-५ महिन्यांनी त्याच प्रोजेक्ट च्या कामासाठी मी ऑस्ट्रेलियाला गेलो. तिकडे तो भेटला. आम्ही पहिल्यांदाच एकमेकांना हायहलो केले. मग अधूनमधून दोनचार वाक्यांचे संभाषण व्हायचे आमचे. पण दरवेळी मला ही जाणीव अस्वस्थ करायची की तो पुण्यात असताना मी त्याच्याशी (आणि तो माझ्याशी) कधीच स्वतःहून बोललो नाही. आणि यात माझीच चूक आहे असेही वाटायचे. Minimum etiquette/ mannerism चेही बोलणे न करणे ही चूकच नाही का?
मला तिकडे जाऊन तीनचार महिने झाले असतील. एकदा आम्ही काही भारतीय (मराठी) मित्र office मधल्याच कॅफेटेरियामध्ये गप्पा मारत बसलो होतो. नाताळचा सुमार असेल. ऑस्ट्रेलियन लोक सुट्टीवर होते. कामही कमी असावे. मध्येच एखादा ऑस्ट्रेलियन colleague येऊन Coke वगैरे घेऊन जायचा. आमच्याकडे बघून त्याच्या डोक्यात ‘यार या भारतीय लोकांना कॉफी पिताना पण ग्रुपने टाईमपास करायला पाहिजे असतो’ असे विचार ऑस्ट्रेलियन इंग्रजीत येत असतील. मला बघून ‘काहीजण तर कॉफी पण पीत नाहीत आणि उगीच ग्रुपमध्ये इतरांना कंपनी म्हणून बसतात’ असा स्वार्थी विचारही येत असेल. मला कॉफी आवडते. पण office मधली कॉफी ही कॉफीची क्रूर चेष्टा आणि बदनामी आहे असे माझे कधीकधी ठाम मत आहे. (Based on vending machine.) त्यामुळे गेल्या दहा हजार वर्षात मी office मध्ये फारतर विसतीस वेळा कॉफी घेतली असेल. असो.
आमच्या गप्पा चालू असताना पाणी पिण्यासाठी स्वरूप आला तिथे. आणि मग गप्पा सुरु झाल्या. आतापर्यंत तो एकदाही कोणाशीही मराठीत बोललेला मला माहित नव्हते. आताही सगळ्या गप्पा त्यांच्या भाषेत झाल्या. त्याने आम्हाला विचारले ‘Did you guys see any places here?’ वगैरे. आम्हीही काही कमी नाही. आम्हीही विचारले ‘How is your wife? Is she an Indian? Was she also born and brought up in Australia? Do you have any relatives in India?’ You see, गप्पा मारणाऱ्या आमच्या ग्रुप मध्ये मुली पण होत्या. :-)
मग तो म्हणाला, ‘My grandpa is in Bombay. I am quite fond of him. I have some cousins in Pune. My dad moved here before I was born… My wife has spent her time equally in India and Australia.’
मग ‘did you like India? How did you spend your time there? Did you see any places? Do you speak Marathi at home?’
‘Yes. I liked India. Went there after quite a long time. We speak Marathi at home. My mother insists. Dad is ok with English. Also my wife and I try to converse in Marathi as far as possible. She speaks fluent Marathi with my mom and dad.’ या गप्पा हा माणूस आमच्याशी पूर्णपणे English मधून मारत होता. ‘We visited Goa. I had the best seafood of my life in Goa… I stayed with my grandpa in Bombay. And also at my cousins’ places. We have a home in Bombay. My dad wanted to sell it. In Pune, I stayed in a hotel near office. I liked Bombay. I spent many of my weekends in Bombay. I liked the people there.’ कोणीतरी मध्ये उगीच पुणेरी बाणा जागवला. ‘Pune is also becoming cosmopolitan.’ मग स्वरूप म्हणाला ‘Yeah…There are many malls and theme restaurants. I am not saying I did not like Pune. पण…’ आणि हे एक वाक्य तो मराठीत बोलला… ‘पुण्याची लोकं खूप friendly नाहीयेत.’
आता या discussion ला पण चारेक वर्षे झाली. पण मला तो उगीचंच ते शेवटचं वाक्य माझ्याकडे बघून बोलला असे आठवते. त्याने शिव्या घालण्यासाठी त्याने मातृभाषेचा आधार घेतला. He did not intend that as a sarcasm directed at me. I am quite certain. But that was one of the most embarrassing moments I remember.