हा अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मला वाटते काही गोष्टी आपण जरा पाहिजे त्या context मध्ये बघत नाही.
पुढे आणखी काहीतरी लिहिण्यापूर्वी एकदोन quotes:
आपल्या देशात क्रिकेट हा मुख्यतः खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे. – पुलं
Golf is like a love affair. If you don’t take it seriously, it’s no fun; if you do take it seriously, it breaks your heart. ~Arthur Daley
“After all, golf is only a game”, said Millicent. Women say these things without thinking. It does not mean that there is any kink in their character. They simply don’t realise what they are saying. – Wodehouse
खेळ वेगवेगळे असतात पण sports fanatics सगळीकडे असतात. आपल्याला उगीच वाटते क्रिकेट हा आपल्याकडे religion वगैरे आहे.
भारत पाकिस्तान world cup match. यात पाकच्या पंतप्रधानांना बोलावण्यात आले. आता यात क्रिकेट पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे bilateral dialogue आहे हे जर तुम्हाला समाजात नसेल तर राहू द्या.
पण काही मुद्दे:
शेजारील देशात तणाव ही अतिशय वाईट गोष्ट आहे.
मुंबई हल्ल्या नंतर भारत चर्चेला तयार झाला असता, तर जनता खूप नाराज झाली असती.
सरकार वर जनता आधीच काही कमी नाराज नाहीये.
निराबाई, राजा anna, सुरेश अप्पा, thomas uncle हे लोक जरा जास्तच हपापलेले वाटत होते प्रसिद्धीकरिता. त्यामुळे मिडीया चे लक्ष्य/लक्ष दुसरीकडे वळवायला पाहिजेच होते.
त्यात क्रिकेट सामान्यासारखी चांगली संधी कोण सोडणार?
दोन्ही संघांना ताकीद दिलीच असणार. त्यामुळे दोन्ही बाजूचे खेळाडू खिलाडू वृत्तीने वागले मैदानावर. आफ्रिदी बिचारा. मानायला पाहिजे त्याला. चांगला captain वाटला मला तो. वर त्यांच्या देशात जाऊन भारताविरुद्ध बोलावे लागले मैदानावर हसतखेळत वागल्याने आणि सामना हरल्याने. नाहीतर त्यांच्याकडचे लोक वैतागले असते. प्रतिस्पर्ध्याला नेस्तनाबूत करावे असे त्यांनाही वाटतच असणार. भावना काही फक्त आपल्याला नसतात. सरकारचे घोळ आणि आंतरराष्ट्रीय राजकारण घाणेरडे आहेतच. पण एका क्रिकेट match पेक्षा त्या गोष्टी खूप – खूप जास्त महत्वाच्या आहेत.