आमची सहल या विषयावर (नसलेला) निबंध

आता हे जरा उगीचंच आहे हे आधीच लक्षात घेऊन पुढे वाचा:

शाळेत (म्हणजे ऑफिसला) जाताना आज दोन म्हशी दिसल्या. त्यापैकी एकीच्या पाठीवर कावळा बसला होता. एकदम पुलंच्या पाळीव पक्षांमधले वाक्य आठवले- ‘म्हशीच्या पाठीवर बसून सहलीला निघालेला कावळा बघून उडण्याचा पक्ष्यांनाही कंटाळा …’ आणि तसा काही संबंध नसताना अगदी सहजच विचार आला – ‘When was the last time I used the word – सहल?’

आपल्यासारख्या grown up kids चे राहू दिले तरी लहान मुलांच्या सहलीसुध्दा आजकाल ट्रिप्स झाल्यात. सहल म्हणायला काय हरकत आहे? मराठी बोलताना. ट्रिपला सहल म्हणणे तसे सोपेही आहे. उगीच ट्रेकला गिर्यारोहण म्हणण्यासारखंही नाही. उगीच आततायीपणा नको. आग्रहच धरला पाहिजे असे नाही. (although, सुरवातीला  सवय होईपर्यंत हटाग्रह वाटणारच.) जमले तर. आणि सहल हा तसं पाहिलं तर ‘सुंदर’ शब्द आहे.

कशासाठी?

मला हिंजवडीचे हिंजेवाडी झालेले दिसले आहे. समोर एखादा accident होताना बघावा ना Discovery वरच्या greatest crashes वगैरे बंडल प्रोग्राम मध्ये दाखवत असलेला… अगदी तसे मी ते पाहिले आहे. अर्थात हिंजवडीचे हिंजेवाडी झाले यात नवीन काही नाही. पुनवडीचे पुणे झालेच की. वानवडीचे काय होणार?

हा प्रवाह आहे. (कालौघ – काळाचा ओघ हा त्यातला महत्वाचा ओघ. पण इतरही आहेतच. Cosmo population, Fast life, why bother, सगळेच म्हणतात तर आपण कशाला शहाणपणा, वगैरे वगैरे.) यात काही चूक नाही, नव्हते आणि असणार नाही. डार्विनाआजोबांनीच तसे सांगितलेय.

पण मग हे जर अटल आहे तर प्रवाहात सामील का होऊ नये? मला वाटतं, याला दोन उत्तरे आहेत.

एक म्हणजे प्रवाहात सामील व्हावे.

दुसरे म्हणजे प्रवाहात सामील नसेल व्हायचे, तर का व्हायचे नाही याचे काही खूप काही गहिरं कारण आहे, आणि आपण खूप काहीतरी मोठे काम करतोय असे वाटून घेऊ नये. हा ego  सोडून द्यावा. आपापली संस्कृती जपणे हा प्रत्येकाचा धर्म आहे – we are conditioned to do that. यात मध्यमवर्गीय मानसिकता वगैरे analysis करू नये. काही गोष्टी फक्त करायच्या म्हणून करायच्या असतात. त्या तशा कराव्याशा वाटणं- ती प्रेरणा हेच त्यासाठीचं supporting reason आहे.

Advertisement

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.