आमची सहल या विषयावर (नसलेला) निबंध

आता हे जरा उगीचंच आहे हे आधीच लक्षात घेऊन पुढे वाचा:

शाळेत (म्हणजे ऑफिसला) जाताना आज दोन म्हशी दिसल्या. त्यापैकी एकीच्या पाठीवर कावळा बसला होता. एकदम पुलंच्या पाळीव पक्षांमधले वाक्य आठवले- ‘म्हशीच्या पाठीवर बसून सहलीला निघालेला कावळा बघून उडण्याचा पक्ष्यांनाही कंटाळा …’ आणि तसा काही संबंध नसताना अगदी सहजच विचार आला – ‘When was the last time I used the word – सहल?’

आपल्यासारख्या grown up kids चे राहू दिले तरी लहान मुलांच्या सहलीसुध्दा आजकाल ट्रिप्स झाल्यात. सहल म्हणायला काय हरकत आहे? मराठी बोलताना. ट्रिपला सहल म्हणणे तसे सोपेही आहे. उगीच ट्रेकला गिर्यारोहण म्हणण्यासारखंही नाही. उगीच आततायीपणा नको. आग्रहच धरला पाहिजे असे नाही. (although, सुरवातीला  सवय होईपर्यंत हटाग्रह वाटणारच.) जमले तर. आणि सहल हा तसं पाहिलं तर ‘सुंदर’ शब्द आहे.

कशासाठी?

मला हिंजवडीचे हिंजेवाडी झालेले दिसले आहे. समोर एखादा accident होताना बघावा ना Discovery वरच्या greatest crashes वगैरे बंडल प्रोग्राम मध्ये दाखवत असलेला… अगदी तसे मी ते पाहिले आहे. अर्थात हिंजवडीचे हिंजेवाडी झाले यात नवीन काही नाही. पुनवडीचे पुणे झालेच की. वानवडीचे काय होणार?

हा प्रवाह आहे. (कालौघ – काळाचा ओघ हा त्यातला महत्वाचा ओघ. पण इतरही आहेतच. Cosmo population, Fast life, why bother, सगळेच म्हणतात तर आपण कशाला शहाणपणा, वगैरे वगैरे.) यात काही चूक नाही, नव्हते आणि असणार नाही. डार्विनाआजोबांनीच तसे सांगितलेय.

पण मग हे जर अटल आहे तर प्रवाहात सामील का होऊ नये? मला वाटतं, याला दोन उत्तरे आहेत.

एक म्हणजे प्रवाहात सामील व्हावे.

दुसरे म्हणजे प्रवाहात सामील नसेल व्हायचे, तर का व्हायचे नाही याचे काही खूप काही गहिरं कारण आहे, आणि आपण खूप काहीतरी मोठे काम करतोय असे वाटून घेऊ नये. हा ego  सोडून द्यावा. आपापली संस्कृती जपणे हा प्रत्येकाचा धर्म आहे – we are conditioned to do that. यात मध्यमवर्गीय मानसिकता वगैरे analysis करू नये. काही गोष्टी फक्त करायच्या म्हणून करायच्या असतात. त्या तशा कराव्याशा वाटणं- ती प्रेरणा हेच त्यासाठीचं supporting reason आहे.

आमचे उपोषण

उपोषणावर आमचे भाष्य:

१. “आई, मला आताच्या आता जेवायला वाढ नाहीतर मी उपोषणालाच बसेन.”
२. “फलाहार करून मी उपोषणाला बसणार आहे. पहिला अर्धा तास आमरण आणि तिथून पुढे लिमिटेड उपोषण करणार.” (द. मां. च्या भोकरवाडीतला बाबू (?) पहिलवान उपोषणाला बसतो त्या कथेतून.)
३. “जेवण मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही.”
४. “ठीक आहे. बस तू उपोषणाला पण तू उपोषण सोडत नाही तोपर्यंत मीही जेवणार नाही.”
शेवटी Wodehouse चा situation मध्ये अति कौशल्याने वाट्टेल तसा फिरवलेला विनोद.:
It has sometimes seemed to me (said Mr. Mulliner, thoughtfully sipping his scotch and lemon) that to the modern craze for dieting may be attributed all the unhappiness that is afflicting the world today. This is what happened in the case of China and Japan. It is this that lies at the root of all the unpleasantness in the Polish Corridor. And look at India. Why is there unrest in India? Because its inhabitants eat only an occasional handful of rice. The day when Mahatma Gandhi sits down to a good juicy steak and follows it up with a roly-poly pudding and a spot of stilton, you will see the end of all this nonsense of Civil Disobedience.
(हा एक विनोद होता पण हा  गांधींच्या मार्गांचा एक छान आढावाही होता का?)

Just Like That :)

इथे असेच उगीच घडलेले, न घडलेले विनोदी किस्से, विचार, इ. शक्यतो jokes च्या पुस्तकांत न सापडणारे. I update this once in a while.

******************************************************************************************************

चांगले शिकले सावरलेले लोक – होंडा सिव्हिक वगैरे गाड्या. पण सिग्नलच तोडतात, लेन सोडून आडवेतिडवे ओवरटेक करतात.

मला कधी कधी वाटते की पुण्यातले हे लोक बऱ्याचदा स्वतःला फार अडाणी समजतात. :)

***************************************************************************

काल हम दिल दे चुके सनम चालू होता. तडप तडप के च्या आधीचा सीन चालू होता – सलमान निघून जाताना ऐश्वर्या धावत येते… सलमान statue ची खूण करतो. मामा म्हणाला, अरे आता तडप तडप के हे गाणं आहे. मी म्हणालो, मग काय गोली मार भेजे मे असणार का?

***************************************************************************

झहीर खानला वाटते की आपल्या एका over मधले सातही balls हे yorkers असावेत. :-)

************************************************************************

अशोक लक्ष्याचे (आणि सचिन, महेश कोठारेचे) चित्रपट कोणाला आवडत नाहीत? (By the way, that was a rhetoric question. ) हे म्हणजे तुम्हाला जंगल बुक, duck tales  आवडते का असे विचारल्यासारखे आहे.

मला वाटतं हा पाचकळ विनोद आमच्यासारखे आम्हीच मधला आहे. (अभय आणि निर्भय – अशोक सराफ आणि सचिन चे डबल रोल्स)
सुधीर जोशी- अहो पण मी तुम्हाला फोन केला होता. चांगला दोनदा.
सचिन – हं. दोनदा तुमचा फोन आला त्यावेळी मी फोनजवळ नव्हतो. आणि नंतर मी दोनदा फोनजवळ होतो, पण तुमचा फोनच नाही आला.

*************************************************************************

अमेरिकेत मला बऱ्याच foreign languages ऐकायला मिळाल्या. प्रमुख  foreign languages म्हणजे चीनी लोकांची चायनीज, मक्कू लोकांची Spanish आणि अण्णा लोकांची तेलगू.

**************************************************************************

मैं अतुल हुं क्योंकि मेरा नाम भी अतुल है – Influenced directly by Andaaz Apna Apna’s Teja.

Now one step ahead…a little improvisation, if you will…. See if you appreciate it. ‘मैं तेजा हूं और मेरा नाम भी तेजा हैं. Just replaced क्योंकि with और to create a wittier dialog (in my opinion.) Take a moment. Read on only if you appreciate this.

So here we go….Again a subtle improvisation….

मैं अतुल हुं और मेरा नाम भी अतुल है.

How would you like it as this blog’s tagline? (Sort of ‘असा मी असामी’ सारखे.)

**************************************************************************

माझ्या बहिणीचा sense of humor विसंगतीच्या बाबतीत माझ्यापेक्षा sharp आहे. परवा एका hair oil च्या जाहिरातीत लिहिले होते, ‘आपके बालों को नयी शक्ती दिलाता है. नियमित इस्तेमाल से आपके बाल ज़ड से मजबूत बन जायेंगे, आपके खोये हुये बाल भी लौट आयेंगे और बाल घने भी हो जायेंगे’. हे वाचत असताना खोये हुये बाल लौट आयेंगे वाचल्यावर ती हसायलाच लागली.

**************************************************************************

आपण नेहमी म्हणतो की फळांचा राजा आंबा. पण मला वाटते की फळांचा राजा नारळ असावा. कारण आंब्याला आयाळच नसते.

**************************************************************************

आंबे दरवर्षीच महाग असतात. म्हणून एक जोक. माहीत असेल कदाचित:

तुम्ही: काका, आंबे कसे दिले? चांगले आहेत ना?

आंबेवाला (तुमच्याकडे न बघता, गरज नसताना सफरचंद नीट रचून ठेवत): खराब माल ठेवत नाही आपल्याकडे.

तुम्ही: रत्नागिरी आहेत का?

तो: देवगड. देवगड.

(वास्तविक हापुस असले तरी हे देवगडचेही नाहीत आणि रत्नागिरीचेही नाहीत. पण गरजवंताला अक्कल नसते. अर्थात, आपल्याइतकाच तोही गरजवंत आहे. पण आपण तसे आहोत हे तो आपल्यासारखे दाखवू लागला तर मग सगळेच संपले.)

तुम्ही: कसे दिले?

तो: पाचशेनी. किती घ्यायचे?

तुम्ही (बावळटपणाने हसत): एवढे महाग? काही कमी नाही का?

तो: मग चिक्कू घ्या. चिक्कूही चांगलेच आहेत.

(वरच्या किश्शातील तुम्ही म्हणजे मी नाही. कारण मी bargaining करणारांच्या पंथातला नाही. गेल्या काही वर्षांतला माझा अनुभव मला असे सांगतो की जवळजवळ एकाही विक्रेत्याला माझ्याशी bargaining करणे जमत नाही. आणि आंबेवाला ‘खराब माल ठेवत नाही आपल्याकडे’ असे मला म्हणाला तर केवळ तितकेच फटकळ उत्तर ऐकण्याचा मोह अनावर झाल्यानेच तो तसे म्हणेल, असा माझा समज आहे.’)

*******************

vulgar warning: दुष्काळात तेरावा महिना ही म्हण दुष्काळात जिथे वर्षाचे बारा महिने जिणे अवघड झाले तिथे आणखी एक अशा अर्थाने. पण या म्हणीचा एक वेगळा अवतार कसा वाटतो पहा. warning: जरा vulgar आहे. तर ही म्हण अशी- दुष्काळात नववा महिना.

*******************

मध्ये carrom खेळताना झालेला joke:

Carrom खेळताना बडबड करण्यापलीकडे काही विशेष नसते करण्यासारखे. एक अगदी स्ट्रेट शॉट गेला नाही तेव्हा अव्या हसायला लागला. त्याला म्हणालो, गप रे.  हे माझे strategic planning आहे, पुढच्या वेळेस… मला अडवत तो म्हणाला, ’कॅरम मध्ये कसलं आलंय strategic planning!’ मी म्हणालो, ‘तुला माहीत नसेल तर जाऊदे. पण हे strategic planning  मी गॅरी कास्पारोव्ह कडून शिकलोय. असं अत्यंत टाइमपास बोलणं चालू असताना शेजारी बसलेला सम्या म्हणाला,  कास्पारोव्ह TT खेळतो का?

***************

खास पुण्याचे असे कोणते खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत?

पुण्याचे वैशिष्ट्य म्हणता येतील अशा ‘खायलाच पाहिजेत’ category तल्या दोन गोष्टी पुण्यात मिळतात – चितळेंची बाकरवडी आणि रत्नागिरी हापूस. :)

*****************

ज्या मुलांना आणि मुलींना स्वयंपाक बरा बनवता येतो, त्यांना ते स्वयंपाक करताना इतरांनी मध्ये लुडबूड केलेली सहसा चालत नाही. इथवर ठीक आहे. काही मुलं तर आनंद घेऊन स्वयंपाक करतात. तेही एकवेळ ठीक. दोष कोणात नसतात! पण त्यातले काहीजण आपल्याला दुस-यांची लुडबूड चालत नाही, हे विसरून, स्वतः मात्र त्यांना सूचना देत असतात. माझा एक मित्र स्वतः हौशी व इतरांना उगीच सूचना देणा-यांपैकी. एकदा तो कॉफी बनवत असताना त्याला म्हटलं, ‘अरे माझ्या कप मध्ये अजून थोडी कॉफी टाक.’ तो म्हणाला, ‘अरे, कडू होईल मग.’ मी म्हाणालो, ’होऊ दे. कॉफी कडूच पाहिजे. मला चालेल.’ मग मीच त्याच्या हातातून कॉफी घेत कप मध्ये टाकली. तो म्हणाला ‘एवढी कॉफी. आमच्यात अशी नाही बनवत कॉफी.’ मग मी काहीतरी sarcastic comment च्या मूडमध्ये दिसलो असेन म्हणून लगेच विषय बदलत म्हणाला,  ’काल एक मुलगी बघायला गेलो होतो.’ मी म्हटलं, ‘अरे कांदेपोह्यांच्या कार्यक्रमांत काय प्रश्न विचारतोस तू?’ तो म्हणाला, ‘काय विचारणार – आपलं नेहमीचंच. कॉलेज कोणतं होतं, करिअर बद्दल. Hobbies काय?’ मग मी म्हणालो, ‘मग एखादी गोष्ट पसंत नसेल तर तू लगेच reject  करून मोकळा होत असशील.’ हा विषय मी कुठे घेऊन चाललोय याची त्याला कल्पना असायचं काही कारण नव्हतं. म्हणून मग typical हावभाव करत समजावून सांगण्याच्या style ने तो म्हणाला, ‘असं नाही रे. या गोष्टींना लगेच नाही म्हणून चालत नाही.’ मी म्हणालो, ‘हां, ते बरोबरच आहे. बरं. आणखी काय विचारतोस?’ तो म्हणाला, ‘असंच रे.’ मी विचारले, ‘स्वयंपाक बनवता येतो का, असं विचारत असशील?’ तो म्हणाला, ‘हो. तो प्रश्न असतोच generally.’ मग मी म्हणालो, ‘पण मग मुलीने स्वयंपाक बनवता येतो असं म्हटल्यावर, तू लगेच reject म्हणून मोकळा होत असशील!’ :)

*****************

मला कपूर खानदान मधला कोणी actor/ actress फारसे आवडत नाहीत. तुम्हाला शशी, शम्मी, करीना, रणबीर वगैरे आवडत असतील, तर त्यात दोष तुमचा नाही. त्यांचा आहे. जनहितार्थ का होईना, त्यांनी मुळात acting करायलाच नकोय. :)

मला कपूर खानदानातलं कोणीच आवडत नाही. राज कपूर पण नाही, करिश्मा पण नाही आणि सैफ अली खान तर नाहीच नाही.

*****************

“And who are you?”

“The name is Bond. Jason Bond.” :)

********************

परवा संपलेल्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला २-० ने हरवले.  त्यावेळी रिकीचंद्ररावजी पॉंटिंगसाहेबांना काय वाटले असेल?

******************

परवा ‘Life in a Metro’ बघितला. बरा आहे.  शिल्पा शेट्टीला थोडीफार acting करायला मिळावी, असा director चा प्रयत्नही दिसला. बरी केलीयं तिनेपण. एकतर सुंदर मुली रागावलेल्या असताना, हसताना, लाजताना, रडताना, नाचताना आणि इतर वेळीदेखील (हेच म्हणायचं होतं तर मग आधीच्या सगळ्या situations – रडताना वगैरे  कशाला टाकायच्या? :) ) सुंदर दिसतात. आणि  generally तशा सगळ्याच मुली नाचताना सुंदर दिसतात. बाकी सगळं ठीक आहे एकवेळ, पण एक प्रॅक्टिकल जोक केलाय त्यात. त्यात धर्मेंद्र असतो ना धर्मेंद्र, त्याचं नाव अमोल ठेवलंय. धिस ईज मात्र टू मच हां. टू मच म्हणजे अगदी फारच टू मच. अहो ज्या माणसाचं नाव तरूणपणी वीरू म्हणून शोभलं, त्याला म्हातारपणी अमोल काय म्हणायचं! हे म्हणजे पुलं म्हणतात ना ‘सत्यभामाबाई बाहीछाट पोलके घालून आल्या.’ तसं वाटतं. बाहीछाट माने sleeveless. किंवा बळिराम दांगटाला गणितात विशेष गती असल्यासारखं.

By the way, ‘This is मात्र too much’ हे गंगाधर गाडगीळांच्या बंडूचे वाक्य. पण त्या अगोदरचं वाक्य सही जमलंय. ‘त्यात धर्मेंद्र असतो ना धर्मेंद्र, त्याचं नाव अमोल ठेवलंय.’ :) ‘Metro पिच्चरेना, तिच्यात ते एक धर्मेंद्र असतंय काय’ या गावंढळ कोल्हापुरी चा हा अवतार आहे. आणि movie मध्ये नाव ‘ठेवतात’ का? की chracter चे नाव असते? असो.

******************

तुषार ने काल ऐकवलेला joke:

आई मावशीने मझ्यासाठी आणलेल्या स्थळाचे  एकदम कौतुक करीत होती. दिसायला खूप छान आहे वगैरे. कालच मावशीचा मला फोनही झाला होता. त्यात आता आई म्हणाली, ‘अरे, पण फोटो बघायला काय हरकत आहे? आण गं तो फोटो.’ मग बहीण फोटो घेऊन आली आणि मला म्हणाली, ‘आहे की नाही, सुंदर!’ मी म्हणालो, ‘सुंदर तर आहे. अगं पण त्यामुळे आमच्या पत्रिका नाही जुळणार.’ :)

******************

परवा चुकून TV वर गाणी बघत होतो. ऐश्वर्या आणि अर्जुन रामपाल चे दिल का रिश्ता मधले ‘कब बन जायेगा तेरे काबिल, मेरा दिल’ हे गाणे चालू होते. Acting बद्दल नको बोलायला, पण ऐश्वर्या आणि अर्जुन रामपाल दोघेही चांगले मॉडेल्स. आणि ऐश्वर्या नाचतेही चांगली. त्या गाण्याचा शेवटच्या sunset च्या against घेतलेल्या steps चांगल्या आहेत. पण मध्ये कुठेतरी अर्जुन रामपाल ला नाचताना पटकन विचार आला मनात, ‘अरे अर्जुन रामपाल तर ऐश्वर्या राय चा dance करतोय!’ :)

******************

कलिंगड हे सही फळ आहे. पण मस्त रवाळ, पाणीदार, गोड कलिंगड खाताना पहिली गोष्ट आडवी येते ती म्हणजे बिया. कलिंगडात बिया पहिजेतच कशाला?…. आणि… रत्नागिरी हापूस मध्ये?

*****************

एका मित्राच्या बहिणीने – तिला तिच्या मित्राने – सांगितलेला किस्सा:

मी बाइकवर होतो. एका कारला overtake करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात असताना अचानक ती कार वळली. Indicator न दाखवता वळवल्यामुळे जरा चिडलो होतो. Driver ला जरा जाब विचारावा म्हणलं. बघतो तर आजोबा. मग त्यांना जरा तक्रारीच्या सुरात म्हणालो, ‘काका (रस्त्यावरच्या आजोबांना काका म्हणतात), वळताना indicator नव्हता दाखवला. आजोबा म्हणाले, ‘तुम्हाला indicator चा छोटा दिवा दिसतो, तर मग वळणारी एवढी मोठी कार दिसत नाही का?’

******************

जर अभिषेक बच्चनला dance करता येत असेल, तर मग मलापण dance करता येतो. (Heavily inspired from G. Boycott’s comment on Afridi: ‘If Afridi is 16yrs old, then I am 28.)

*****************

A Douglas Adams joke from one of the books from the Hitchhiker series :

He remembered A.Express credit card. These cards were wonderful, multi functional. So they claimed in their junk mail.

मराठी पिक्चर मध्ये हिरोला फार त्रास न घेता हिरॉईन पटते- अशोक, लक्ष्या, इ. ब-याचदा तर तीच आधी याच्यावर फिदा असते. समजा, दादा कोंडकेंच्या पिक्चर मध्ये हिरोला हिरॉईन पटवणे ही गोष्ट अशक्यप्राय कठीण गेली, तर पिक्चरची story साधरणपणे कशी असेल?

******************

Manorama Six Feet Under हा तसा वेगळा सिनेमा.  Somewhat non-filmy. Yet not exactly an art film. विषेश चालला नाही. मात्र Jab We Met हा पिक्चर खूप चालला. मित्राच्या ग्रुप मध्ये घडलेला किस्सा :

A: अरे, आपण सगळेजण Jab We Met ला जाऊया. हिट झालाय. गाणी पण चांगली आहेत.

B: त्यापेक्षा Manorama- Six Feet Under बघूया. चांगला आहे, म्हणतात.

A: अरे. तू असे पिक्चर कसे काय बघू शकतोस. नावच बघ कसे आहे!

B: तू  Jab We ‘Mate’ नावाचा पिक्चर बघतोस, ते चालतं का? :)

*******************

तुम्ही एखाद्या modern art चित्रप्रदर्शनाला गेलात आणि जर एखादं चित्र पाहून असं म्हणालात की हे चित्र काढताना जरा चुकलंय तर आजूबाजूच्या जाणकारांना किंवा त्या चित्रकाराला काय वाटेल?

************************

Follow

Get every new post delivered to your Inbox.