अर्धवट सोडलेले चांगले चित्रपट

पिक्चर बघताना अजूनही मी हसतो. हे जरा विचित्र वाटले असेल तर आणखी थोडा विचित्र प्रकार म्हणजे मी पिक्चर बघताना कधीकधी रडतोसुद्धा. मी तसा सेंटी माणूस आहे. पण हसणे म्हणजे कमी विचित्र आणि रडणे अधिक हे कोणी ठरवले?

आता विषय इतका मुलभूत नको. उगीच जड होतो. विषय आहे बघता बघता सेंटी वगैरे  असल्याने अर्धवट सोडलेल्या पिक्चरचा.

मी अर्धवट सोडलेल्या काही पिक्चरची नावे:

Grave of the fireflies. (Japanese Anime)- दुसऱ्या युद्धात जपान मधील शहरांवर बॉम्ब हल्ले सुरु आहेत. अशात आपल्य लहानग्या बहिणीला घेऊन देशोधडीला लागलेला सहासात वर्षांचा लहान मुलगा. भयानक सेंटी होता हा पिक्चर. मला रवीने सांगितले होते की एकाच बैठकीत त्याला हा पिक्चर बघवला नव्हता. माझीही तशीच अवस्था झाली.

Hilary and Jackie : दोन बहिणी. संगीतकार. लहानपणी एक पुढे जाते. तर मोठेपणी दुसरीला प्रसिद्धी मिळते. पण मग आजारपण. आणि मग एकीचे दुसरीला जीव लावणे, वगैरे.

Schindeler’s List आणि The Pianist हे पिक्चर्स मी अजूनही पूर्ण बघितले नाहीत. हे थोडेसे सेंटी वाटले म्हणून. आणि मी ज्यावेळी हे पहिल्यांदा बघायचे ठरवले त्यावेळी मी दुसरे युद्ध या विषयावर इतके पिक्चर्स बघितले होते की मला nausea आला होता अगदी. पण  नंतरही ज्या ज्या वेळी बघायला घेतले त्या त्या वेळी थोडेदेखील सेंटी वाटू लागले की बंद करून अर्धवट सोडले.

असे आतातरी इतकेच आठवताहेत. असे काही आणखी पिक्चर्स तुम्हाला माहीत असतील तर नक्की सांगा. मला आवडतील बघायला. :-)

टकलू

I had written this first on 28th November 2005.

मला लहान मुलं खूप आवडतात. पण ५-६ वर्षांपुढची. As a rule, I hate anything in the human shape under the age of 4-5. एकतर ती मुले इतकी लहान असतात की मला काय करावे सुचत नाही. ती मुले मला खेळवू पण नाही शकत. (पण त्यांचे डोळे काळे असतील तर ‘dark’ काळे असतात.  So rare in the grown ups.) आणि माझ्या जवळ असताना ती रडायला लागली तर मला guilty वाटते. त्यांच्या आया (म्हणजे moms) दादा मामा काका काहीतरी म्हणून माझ्याकडे त्याला पाठवतात आणि मग ५ मिनिटांमध्ये जेव्हा ते बिचारे मूल रडायला लागते त्या वेळी परत माझ्याकडून घेतात त्या वेळी आयांचा जो look असतो ना… एकतर मला आधीच कसेतरी वाटत असते आणि वर तो look.

मुलाला दुपारी झोपवणे tries my patience. सगळ्यात वैताग म्हणजे मुलांना खेळायला/फिरायला घेऊन जाणे. मुलं see-saw खेळतात. मला see-saw खेळायला बिलकूल आवडत नाही!

I, as such, don’t know what to talk to kids. उगाच काहीतरी आवाज काढून त्यांना खेळवणे मला नाही जमत. त्यामुळे मला मुले दुरून चांगली वाटतात. Many times I wonder what I would do if I get to see some live Chintoo gang in the locality? मला वाटते की मी त्यांना दुरून observe करीन.

 

Yesterday I went to a hair dresser. A kid came all alone to have a haircut. Age – perhaps 6.

“काका मी बसू का?”

“काका, एकदम टकलू नका करू बरंका.” He struck a chord here. Taklu is a word I often use when teasing young chaps.

“अरे बाळा, तू खाली बघ ना. तुला खाली बघायला सांगितले तरी तू आरशात बघतोस.”

“पण मग तुम्ही टकलू नाही ना करणार?”

“काका, केस कापल्यावर दररोज केस विंचरावे नाही लागणार?”

“पण मग खूप छोटे नका करू.”

 

Now the problem with all the barbers is that they talk too much. Too much म्हणजे काय अगदी फरच too much. They can have a say on anything and they have a say on everything. So the discussion among the barbers turned to Raj, Udhhav, Balasaheb, Shivsena issue.

“काका, तुम्ही शिवसेनेचे आहात?”

आता त्या हिरोला शिवसेना म्हणजे काय हे पण माहीत नसेल. I was wondering what the barber’s answers was going to be. But before he could answer, another barber said, “तुम्ही म्हणताय ते खरे आहे प्रकाशशेठ पण भारतीय विद्यार्थीसेना सगळी राजच्या हातात आहे.”

“काका, तुम्ही सेठ आहात?”

takalu

आमची सहल या विषयावर (नसलेला) निबंध

आता हे जरा उगीचंच आहे हे आधीच लक्षात घेऊन पुढे वाचा:

शाळेत (म्हणजे ऑफिसला) जाताना आज दोन म्हशी दिसल्या. त्यापैकी एकीच्या पाठीवर कावळा बसला होता. एकदम पुलंच्या पाळीव पक्षांमधले वाक्य आठवले- ‘म्हशीच्या पाठीवर बसून सहलीला निघालेला कावळा बघून उडण्याचा पक्ष्यांनाही कंटाळा …’ आणि तसा काही संबंध नसताना अगदी सहजच विचार आला – ‘When was the last time I used the word – सहल?’

आपल्यासारख्या grown up kids चे राहू दिले तरी लहान मुलांच्या सहलीसुध्दा आजकाल ट्रिप्स झाल्यात. सहल म्हणायला काय हरकत आहे? मराठी बोलताना. ट्रिपला सहल म्हणणे तसे सोपेही आहे. उगीच ट्रेकला गिर्यारोहण म्हणण्यासारखंही नाही. उगीच आततायीपणा नको. आग्रहच धरला पाहिजे असे नाही. (although, सुरवातीला  सवय होईपर्यंत हटाग्रह वाटणारच.) जमले तर. आणि सहल हा तसं पाहिलं तर ‘सुंदर’ शब्द आहे.

कशासाठी?

मला हिंजवडीचे हिंजेवाडी झालेले दिसले आहे. समोर एखादा accident होताना बघावा ना Discovery वरच्या greatest crashes वगैरे बंडल प्रोग्राम मध्ये दाखवत असलेला… अगदी तसे मी ते पाहिले आहे. अर्थात हिंजवडीचे हिंजेवाडी झाले यात नवीन काही नाही. पुनवडीचे पुणे झालेच की. वानवडीचे काय होणार?

हा प्रवाह आहे. (कालौघ – काळाचा ओघ हा त्यातला महत्वाचा ओघ. पण इतरही आहेतच. Cosmo population, Fast life, why bother, सगळेच म्हणतात तर आपण कशाला शहाणपणा, वगैरे वगैरे.) यात काही चूक नाही, नव्हते आणि असणार नाही. डार्विनाआजोबांनीच तसे सांगितलेय.

पण मग हे जर अटल आहे तर प्रवाहात सामील का होऊ नये? मला वाटतं, याला दोन उत्तरे आहेत.

एक म्हणजे प्रवाहात सामील व्हावे.

दुसरे म्हणजे प्रवाहात सामील नसेल व्हायचे, तर का व्हायचे नाही याचे काही खूप काही गहिरं कारण आहे, आणि आपण खूप काहीतरी मोठे काम करतोय असे वाटून घेऊ नये. हा ego  सोडून द्यावा. आपापली संस्कृती जपणे हा प्रत्येकाचा धर्म आहे – we are conditioned to do that. यात मध्यमवर्गीय मानसिकता वगैरे analysis करू नये. काही गोष्टी फक्त करायच्या म्हणून करायच्या असतात. त्या तशा कराव्याशा वाटणं- ती प्रेरणा हेच त्यासाठीचं supporting reason आहे.

लीना वावडेकरांचे पाठलाग

लीना वावडेकरांचे पाठलाग हे पुस्तक मी लहान असताना वाचले होते. माझ्या मामाकडे एका आलुमिनियम कलरच्या पेटीत पुस्तकांचा बराच साठा होता. (२०११ च्या cricket world cup वेळी ही जाहिरात आली होती – कोणत्या तरी टॉर्चवाल्या मोबाईलची – यह गोट नही है, यह बोट नही है, यह कभी कभी बीबी है- आलुमिनियम-सुब्रमन्नम असे काहीतरी होते) पुस्तके अशी मातृकथा, चांदोबा, पुराणातील स्त्रीकथा वगैरे. लहान मुलांना आवडतील अशी. आणि उन्हाळ्याच्या/ दिवाळीच्या सुटीत वाचून पूर्ण होतील अशी. एकदा वाचले परत पुढच्या सुटीत पेटी उघडायची.

माझे मावसभाऊ माझ्यापेक्षा लहान तर मामालोक थोडेसे मोठे. मग मी तीच तीच पुस्तके परत परत वाचत बसायचो दर सुटीत. तेव्हा वाचलेल्या चांदोबातल्या जातक कथा, ‘क्रमशः’ ने संपण्या-या कथा, विक्रमवेताळाच्या कथा, शची, देवहूती, दिती-आदिती, अनसूयेच्या कथा आजही अंधूकशा आठवतात.

पाठलाग हे माझे अत्यंत आवडते पुस्तक. माझे अगदी प्रेमच आहे त्या पुस्तकावर म्हणलं तरी गैर नाही.

कव्हरवर एका जॅग्वारचे चित्र. बिचू. वरच्या उजव्या भागात. खाली डावीकडे एक आदिवासी माणूस. आणि त्याची मुलगी. उरुबेलावा आणि मारिया. त्याच्या पायाला भाता आणि एक बाण धनुष्याला प्रत्यंचा ताणून बिचूवर रोखलेला.

पुस्तकाची सुरुवात… बिचू जखमी झाली होती. जबर….

एक जॅग्वार आपल्या घरापासून खूप दूर आलीये. अजून लहान आहे. तिला आता जखमी अवस्थेत फक्त घर दिसतेय. तो उंच सुळका दिसतो ना दूरवर… तिथे आहे तिचे घर. मध्ये पंपासचा सपाट माळ आहे. एका बाजूला तशी उंच-दाट झाडी आहे. पण माळ पार करायलाच लागेल.

उरुबेलावाला तिचा माग लागलाय. एक पायाने ती लंगडतेय हे पाऊलखूणांवरून उमगलेय. मारियाला घेऊन तो तिच्या मागावर निघालाय. रानटी झुडपाच्या फुलांची माळ करून गळ्यात घालण्याइतकी लहान त्याची ती मुलगी. तिला घरी जायचंय. पण तिची कातडी विकून…मारियाला…

मध्ये नदी येते… लहान प्राण्यांचीसुध्दा शिकार करायची ताकद नाहीये आता बिचूत… रक्ताची उबळ… वणवा येतो… मुसळधार पाऊस येतो… माग धुऊन जातात… स्वच्छ उन येतं… नवे माग तयार होतात… या खुणा बघ. ही माझी जग्वार… कोसळणा-या धबधब्याच्या पातळ पडद्याच्या एका बाजूस बिचू आणि दुस-या बाजूस उरुबेलावा असे श्वास रोखून धरायला लावणारे प्रसंग येतात… एका उडीत ती त्याच्या नरडीत दात खूपसू शकते असा विचार तिच्या मनात येतो… पण तिला घरी जायचं आहे. आईकडे… पण आई बहुधा मारली गेलीये… तो विचारच नको आता… घोडे, बंदुका आणि शिकारी कुत्रे घेऊन शहरातील शिकारी येतात… बिचू त्यांच्या हाती न लागता आपल्या हाती लागावी अशी त्याची ईर्षा… पण त्यालाही त्या शिका-यांपासून धोका आहे…मारियाला आता बिचूबद्दल जवळीक वाटू लागलीये… तिच्या बोलण्यातून ते जाणवतंय… मारियाच्या अंगाला माश्या डसतात… त्यावर तोंडात भिजवलेला तंबाखू लावतो तो…पण त्या जॅग्वारला मी मारीनच… एक दिवस झोपेतून उठल्यावर बाप दिसत नाही तर मारिया घाबरून जाते… बाप नदीवर जाऊन नव्या दिशेला जाणारा माग शोधून आलाय… अगं ती भारीच आहे हां, पोरी… अगदी माझ्यासारखी आहे… हट्टी…इरेला पेटलेली… अशी बापाने कबुली द्यायला सुरुवात केल्यावर मारियाला बरे वाटते… पुन्हा नवा माग… तो सुळका दिसतो ना तिकडे चाललीये ती… माझ्या लक्षात आलंय… वाटेत तिची कोणाशीतरी झुंज झालेली दिसतेय… रक्त सांडलेले दिसतेय… मात्र तिने काहीतरी खाल्ले असणांर… जखमी पाय बरा होऊ लागलाय तिचा… हे ठसे बघ… ती बघ, तिकडे दूर दिसतेय बघ ती जॅग्वार.

सुळका आता जवळ आलाय… मधला हा एक चढ पार केल्यावर तिला या बापलेकींपासून धोका नाही…

पोरी तू थांब इथेच… मी पळत पुढे जातो… तो चढ पार केला तिने तर ती हातातून निसटलीच समज.

पोरगी धावत येते मागून… उरुबेलावाला कळतं पोरीचं मन द्रवलंय…

चढावर बिचू त्याला दिसते… तीसुद्धा वळून बघते…. तो धनुष्याला बाण लावतो… पोरगी बघतेय… बाण न मारता तो जाऊ देतो तिला… मनात आणलं असतं तर मारू शकलो असतो तिला.

एकदा कधीतरी आजीने ती पेटी रिकामी केली… मी त्यानंतर पुण्यातल्या कित्येक दुकानांत ते पुस्तक शोधले. मामाच्या लग्नात मधून वेळ काढून नाशिकमध्येही शोधले… सावा (सार्वजनिक वाचनालय) मध्ये बघा म्हणाले तिथले दुकानदार… सावामधून प्रकाशक कळाले – पुण्याचे उत्कर्ष प्रकाशन. आधी त्यांचा दुकानात विचारले होते… आता मागे जाऊन प्रकाशनात विचारले… ते म्हणाले कोणत्या प्रकाशनाचे आहे? सुदैवाने रॅकवरच सापडले. किंमत चाळीस रुपये. चारशे असती तरी घेतले असते ते पुस्तक. इतका मी त्या पुस्तकाबाबत  nostalgic आहे. घेतले. पाच –सहा वर्षांपूर्वी वाचले. नंतर काका घेऊन गेले वाचायला. वाचले नसणारच. पण कुठेतरी हरवून टाकले. पुस्तकांची अशी हेळसांड मला आजिबात आवडत नाही. आता ते पुस्तक कुठेच मिळत नाही. रस्त्यावर, लयब्ररीज आणि उत्कर्षमध्येसुद्धा. ते म्हणाले वाघाचं चित्र असंलेलं माडगुळकरांचं वाघाच्या मागावर आहे. चांगले आहे. देऊ का? त्यांना कसे सांगू … बालपणीची आढवण माडगुळकर कशी चितारतील. माडगूळकरांच्या आजीने पाहिलेल्या चोराच्या आडवणीही आहेत. पण ही गहिरी आहे. चिखलात हत्तीच्या पायाने ठसवल्यासारखी.

Do I hate my uncle? Yes, in this context. जंग जंग पछाडले तेव्हा तो बालपणीचा ठेवा परत मिळाला होता. आणि तो इतका casually उधळला गेला.

एक आशा आहे… पुढेमागे लीना बावडेकर, त्यांची मुले, नातवंडे हा पोस्ट वाचतील. आणि कदाचित त्यांच्याकडे असलेल्या प्रतींपैकी एखादी मला मिळेल. किंवा कोणीतरी स्कॅन केलेली कॉपी देईल मला.

राजकीय match

हा अर्थात ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मला वाटते काही गोष्टी आपण जरा पाहिजे त्या context मध्ये बघत नाही.

पुढे आणखी काहीतरी लिहिण्यापूर्वी एकदोन quotes:

आपल्या देशात क्रिकेट हा मुख्यतः खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे. – पुलं

Golf is like a love affair.  If you don’t take it seriously, it’s no fun; if you do take it seriously, it breaks your heart.  ~Arthur Daley

“After all, golf is only a game”, said Millicent. Women say these things without thinking. It does not mean that there is any kink in their character. They simply don’t realise what they are saying. – Wodehouse

खेळ वेगवेगळे  असतात पण sports fanatics सगळीकडे असतात. आपल्याला उगीच वाटते क्रिकेट हा आपल्याकडे religion वगैरे आहे.

भारत पाकिस्तान world cup match. यात पाकच्या पंतप्रधानांना बोलावण्यात आले. आता यात क्रिकेट पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे bilateral dialogue आहे हे जर तुम्हाला समाजात नसेल तर राहू द्या.

पण काही मुद्दे:

शेजारील देशात तणाव ही अतिशय वाईट गोष्ट आहे.

मुंबई हल्ल्या नंतर भारत चर्चेला तयार झाला असता, तर जनता खूप नाराज झाली असती.

सरकार वर जनता आधीच काही कमी नाराज नाहीये.

निराबाई, राजा anna, सुरेश अप्पा, thomas uncle हे लोक जरा जास्तच हपापलेले वाटत होते प्रसिद्धीकरिता. त्यामुळे मिडीया चे लक्ष्य/लक्ष दुसरीकडे वळवायला पाहिजेच होते.

त्यात क्रिकेट सामान्यासारखी चांगली संधी कोण सोडणार?

दोन्ही संघांना ताकीद दिलीच असणार. त्यामुळे दोन्ही बाजूचे खेळाडू खिलाडू वृत्तीने वागले मैदानावर. आफ्रिदी बिचारा. मानायला पाहिजे त्याला. चांगला captain वाटला मला तो. वर त्यांच्या देशात जाऊन भारताविरुद्ध बोलावे लागले मैदानावर हसतखेळत वागल्याने आणि सामना हरल्याने. नाहीतर त्यांच्याकडचे लोक वैतागले असते. प्रतिस्पर्ध्याला नेस्तनाबूत करावे असे त्यांनाही वाटतच असणार. भावना काही फक्त आपल्याला नसतात. सरकारचे घोळ आणि आंतरराष्ट्रीय राजकारण घाणेरडे आहेतच. पण एका क्रिकेट match पेक्षा त्या गोष्टी खूप – खूप जास्त महत्वाच्या आहेत.

Follow

Get every new post delivered to your Inbox.