पुलकित

पुलं जाऊन आता बरीच वर्षे झाली. डेक्कनच्या प्रयाग हॉस्पिटलमध्ये घेतलेलं त्यांचे दर्शन आठवतं, पण ते शेवटचं दर्शन असं कधी वाटलं नाही. अर्थात, दर्शन हा शब्दही जरा विचित्र वाटावा, असं आता वय झालंय. आणि वाचन, अनुभवांच्या, जाणिवांच्या कक्षा जरा रुंदावल्यामुळे असेल, पुलंच्या मर्यादाही लक्षात आल्या. त्यामुळे कदाचित भक्तिभाव जरा कमी झाला असेल, पण अजूनही एखाद्या लेखकाच्या ठायी जास्तीत जास्त भक्तिभाव जर कुठे असेल तर तो खात्रीने पुलंच्या बाबतीत आहे. त्यात थोडाफार हातभार थोड्या वेगळ्या पद्धतीने या विस्तारलेल्या जाणिवांचा पण आहेच. एका बाजूने तो बाळबोधपणा निघून गेला ते बरंच झालं. अडचण एक आहे की हे दुसऱ्यांना नीट समजून सांगता येत नाही. आणि विचार केला तर आश्चर्य असे वाटते की या सगळ्या मर्यादा लक्षात येऊनही पुलं एवढे आवडत राहिले आणि आता जवळजवळ खात्री आहे की ते इथून पुढेही आवडत राहतील.

पुलं काही जगातले सर्वश्रेष्ठ लेखक नव्हते. अगदी विनोदी लेखक म्हणूनही. पण ते माझे सगळ्यात जास्त आवडते लेखक आहेत. त्यांचे निरीक्षण, विसंगती बघण्याची किंवा त्यातून विनोद करण्याची त्यांची खुबी, निरीक्षण मांडण्याची पद्धत, गरज नाही अशा ठिकाणी थोडं पुढे जाऊन केलेले विनोद, काल्पनिक आणि वास्तव व्यक्तिरेखा रेखाटतानाचे त्याचे skill, त्यांचे presentation skills, मराठीमध्ये रुजलेला पण त्यामुळे बंधनात अडकलेला त्यांचा विनोद, इत्यादी परीक्षण आपल्याला काही नवे नाही.

Anyway, 12 जूनच्या त्यांच्या official पुण्यतिथीनिमित्त, रावसाहेबांना त्यांनी वाहिलेली श्रद्धांजली आज पुलंसाठी:

‘रावसाहेब गेल्याला आज सव्वीसेक वर्षे होत आली. मधूनच रेडिओवरच्या सतारीवर काहीतरी झंकारतं, पर्युत्सुक करणारा एक जुना स्नेहगंध दरवळायला लागतो. त्यांच्या त्या लेडी सितारिस्टची आठवण येते. हसूही येतं, रडूही येतं. देवाने आमची लहानशी जीवनं समृद्ध करायला दिलेल्या या मोलाच्या देणग्या! न मागता दिल्या होत्या, न सांगता परत नेल्या.

Chintoo_PuLa

Advertisements

Boss Number 1

Continued from an earlier post where we talked about Mohanlal and Pammy.

मोहनलाल च्या लग्नात त्याच्या हळदीच्या कार्यक्रमाला त्याच्या आजीने त्याला विचारलेच ‘मेरे लाल! तू पीला कैसे हो गया?’
हा joke गोविंदाच्या एका पिक्चर मधला कादरखानचा dialog आहे. पण तसेही गोविंदाच्या पिक्चर मध्ये कायपण dialogs असायचेच. उदाहरणच द्यायचे झाले तर गोविंदा एका villain च्या माणसाला म्हणतो ‘सडे हुए टमाटर के जले हुए ऑम्लेट’. आता बोला.

Also, we were talking about Pam Beesly, so it may interest you to know that- BBC’s series The Office is coming to India.

I don’t know if you have seen the original UK version, but it is likely that you have seen the US version. Of course, the original version is qualitatively superior to the adaptation. But Michael Scott is a very likable boss. I don’t know how they converted the world’s worst boss into the world’s best boss. But they certainly did. How could you not love a Michael Scott who goes out of his way to buy Pam’s painting? Or someone who says-

“I’m not superstitious, but I am a little stitious.”

“If I had a gun with two bullets and I was in a room with Hitler, Bin Laden, and Toby, I would shoot Toby twice.”

Compared to this, Ricky Gervais’s David Brent was- as they often say about him- cringe-worthy. He didn’t have social skills and he wasn’t even likable. But people and scenes from UK series were more believable. Dwight is entertaining but Gareth Keenan was closer to real world. And it was more intense than the US version.

Of course, not just Michael, almost everyone in the US version, was likable. You are heartless or at least lucky if you did not feel the pain when Jim says, I kind of put it all on the line twice, but she doesn’t want me. Dwight is interesting. He says in one episode I’m not angry, I just want to know who did it so I can punish them. Then there is Andy. Here is an Andy moment I remembered and then found on the web:

Andy: Hey, any fun weekend plans?
Erin: No, you?
Andy: Uh, no, actually. So nothing? No movies, or parties, or anything you might want to invite someone to?
Erin: Nothing. It’s wide open.
Andy: Okay.
[cuts to Andy in an interview]
Andy: That’s as hard as I can hint.

How could you not like that?

जडणघडण

आपल्या एकंदर घडणीत खूप घटकांचा वाटा असतो संस्कार, शिक्षण, आर्थिक परिस्थिती, वडीलधारी मंडळी, मित्र मैत्रिणी, तब्येत, शहर, देश, इ. एखादा माणूस धाडसी कसा, एखादा भावूक तर दुसरा एखादा भावनाशून्य कसा, एखादा समजूतदार कसा, एखाद्या व्यक्तीला घरी बसून पुस्तके वाचण्यात काय आनंद मिळत असेल याचे नेमके स्पष्टीकरण खात्रीने देणे जवळपास अशक्यप्राय आहे. मी प्रयत्न करू शकतो पण…

माझा एक मावसभाऊ चार्टर्ड अकाउंटंट आहे. तो पहिल्या attempt मध्ये CA झाला आणि लगेचच काही दिवसांनी CS ची exam पण clear झाला. एका मोठ्या कंपनीत नोकरी करतो. तो खूप mature आहे. मोजकेच बोलतो. त्याच्या कंपनीच्या owner(who is probably the richest person in our country) बद्दल काही विचारले तर जास्त काही न बोलता विषय बदलतो (to be sure, I didn’t ask him anything ever about something as boring as that, but my uncle asks and he tells me that my cousin gives him a smile and changes the subject). माझा मामा त्याला काही typical प्रश्न विचारतो. For example, या दोन तीन insurance किंवा इन्व्हेस्टमेंट schemes पैकी which is the best one, etc. मग तो मामाला हा plan अशा प्रकारे beneficialआहे, त्या दुसऱ्या plan मध्ये हे फायदे आहेत, तुम्ही हा plan पण घेऊ शकता, असं काहीतरी सांगतो. आता मला या बाबतींत माझ्या मामापेक्षाही कमी कळतं. पण मला हे माहीत आहे की अशा प्रश्नांना definite उत्तरे नसतात. पण मग मामा त्याला छळतो. तू हातचं राखून ठेवतो, घरात CA असून… वगैरे वगैरे. You know the routine. एकदा आम्ही असंच बसलो असताना अगदी वेगळा विषय सुरू होता. मामाने दोनचार गाड्यांमधली चांगली गाडी कोणती असा काहीतरी विषय काढला होता किंवा मामा कदाचित फोन कोणता घेऊ असं काहीतरी विचारात होता. आता यालाही काही नेमके एक उत्तर नाही. मग माझ्या मावसभावाने थोडे सारवासारवीचे वाटण्यासारखे उत्तर दिले. आणि मग माझा मामा मला म्हणाला की बघ मी याला माझे सगळे parameters सांगितले तरी हा मला फक्त options सांगतो, solution नाही सांगत. And, without thinking, I blurted out, कारण तो एक consultant आहे, engineer नाही.

Now that is not a very polite thing to say. Outside a comfort group, it may seem arrogant, insulting, misguided or ill informed. My cousin, himself, would not have said something like that. And because it was only a group of persons from an extended family and that too not separated by a large age gap, my statement was not taken out of context. Even then I probably would not say that again. Or at least I would expand it a bit.

But while I said that almost without a conscious thought, I think that it was not that far off from reality. Of course, consultants are great, indispensable at consulting. And even though Weinberg’s third law of consulting may appear to say something different, they do have to provide solutions to problems. And to problems which are not clearly defined. They have to suggest approaches based on data and empirical analyses, heuristics, projections and extrapolations. They have to suggest those approaches confidently. Having said that I believe in engineering solutions more. Those, I believe are more rational. At least to engineering audience they appear that way. I think that could be because of somewhat advanced mathematical rigour that engineers can take. And it seeps into their nature. Also, engineers appear more involved. They don’t just suggest a solution. They see it through. It seems that they like to see their solutions through. Of course not everyone is so typecast. Anu generalization of this sort misses the details. I know that. It just seems that an engineering education prepares you that way. Of course, career paths diverge after education. And even so for as influence by education is considered probably it is not even formal education that shapes people. There must have been doctors similar to doctors of today in the past. Say something like 500years ago. So it is probably aptitude. But I think it is cumulative. You are the sum of all that has ever been- more likely you are the product of everything.

Of course, it is an ongoing process. Life is an incessant flow of choices. Every step you take, takes you on a necessarily different path and you are your destination, and the journey.

मोहनलाल

केवळ curiosity म्हणून मी मोहनलालचा दृश्यम बघितला. अजय देवगणचा हिंदीतला रिमेक आधी बघितला होता. सस्पेन्सचा भाग बऱ्याच लोकांना आवडला पण कोलंबोच्या एपिसोड मध्ये जरासा सिमीलर प्रकार बघितला होता.

याला बराच वेळ झाला. पिक्चर हिंदीत बघितल्यानंतर तोच पिक्चर मल्याळम मध्ये बघायची उठाठेव करायला उत्साह पाहिजे. खास करून suspense movie. सांगायचा मुद्दा असा आहे की मला अशा कामात बराच उत्साह आहे. तरी कमल हसनचं तामिळ कि तेलगू मधलं version अजून नाही बघितलं. मला एखाद्या गोष्टीबद्दल चांगला feedback ऐकायला मिळाला की मला त्या गोष्टीबद्दल curiosity वाटायला लागते. आणि माझ्या ही स्वभावातील idiosyncrasy असेल पण ती गोष्ट माझ्या बऱ्याच काळ पर्यंत लक्षात राहू शकते. पुलंच्या भाषेत सांगायचे तर अशा गोष्टींचा पाठपुरावा मी विमा एजंटाच्या चिकाटीने करतो.

Anyway, मोहनलाल was good. Comparatively, his Pulimurugan- where he is a tiger killer- was not too good. But he is a good actor. आणि मला वाटतं- म्हणजे मी त्याचे जेवढे पिक्चर्स बघितलेत त्यावरून- तो हिरो म्हणून एकदम साधे roles करतो. अर्थात action hero म्हणून वाघाला मारायचे roles तो करतो पण तो माणूस म्हणून तो एकदम साधा असतो पिक्चर मध्ये.

तुम्ही बघितलाय का त्याचा एखादा पिक्चर? Now don’t go all Pam Beesly on me and say ‘No. I have a life’.

पावन अपुलें चरित्र वीरा, सांगुं देत मज देव अप्सरा

पुलंनी एके ठिकाणी लिहिलंय: ‘(वसिष्ठ असे म्हणाले आणि) राम हसला. म्हणून लक्ष्मण हसला.’ *

मला इतक्या सहजपणे (म्हणून या एका शब्दात) कचरा करता नाही आला तरी मजा म्हणून प्रयत्न करायचे सोडले नाही. (https://atulatul.wordpress.com/2007/05/27/the-mahabharata-the-pandavas-and-mr-ravana/)

पण या post मध्ये विनोद जरा बाजूला ठेवू. मला रामायण कथा नीट माहीत नाही. पण त्यावर रचलेले तुलसीदासाचे रामचरितमानस रेडिओवर लहानपणी ऐकलेले आठवते. शब्द नाही आठवत पण ती लय, ते सूर कानात किंवा मनात घर करून बसलेत. त्यामुळे हम आपकें हैं कौन मध्ये बरणी फोडणारा अनुपम खेर जेव्हा पोथीत डोकं घालून वाचतो तेव्हा ते सूर ओळखीचे वाटतात.

तसं बघितलं तर रामायणाभोवती भक्तीभावाचे एक वलय किंवा वातावरण आहे. महाभारताभोवती ते तितकंसं नाही. नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल, कारण भागवतधर्म भक्तीमार्गापासून दूर नाही. पण राम हा मर्यादापुरुषोत्तम असल्याने जरा सिरिअस वाटतो. त्यामानाने कृष्ण जितका गंभीर तितकाच खेळकर वाटतो. कृष्ण आपला मित्र वाटतो, राधा मीरेला तो सखा प्रियकर वाटतो, तसा राम वाटत नसावा. आईचा मार खाल्ला म्हणून भोकांड पसरून रडणाऱ्या कृष्णाचं रडणं कधी खरं तर कधी नाटकी वाटू शकते, राम चंद्रासाठी हट्ट करू शकतो हे एकवेळ शक्य वाटते, पण रामाला कौसल्या खोटं का होईना मारत असेल असं चित्र डोळ्यासमोर येतंच नाही. राम त्या थोरलेपणाच्या बाहेर सहसा येत नाही आणि कृष्ण जागोजागी आपण एक शेंडेफळ असल्याचे दाखवून देतो. एकजण सगळ्या मर्यादा सांभाळून पुरुषोत्तम होतो तर दुसरा सर्व मर्यादा झुगारुन देऊन पुरूषोत्तम होतो. किती छान पात्र आहेत ही. कृष्णाच्या चरित्रातून वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रेरणा मिळतात, पण रामचरित्रातून मनात पहिल्यांदा भक्तिभाव जागतो. निदान मलातरी तसं वाटतं.

रामायणाचे माझे वाचन आणि त्यामुळे ज्ञान तसे कमी आहे. पण मी गीतरामायण किती वेळा ऐकलंय याची काही गणतीच नाही. तुलसीदास काय म्हणतो हे कळाले नाही तरी त्याच्या रामचरितात एक गोडवा आहे. (Youtube वर रामचरित मानस all India radio शोधा, लताचं.) आणि सुधीर फडके आणि गदिमांच्या गीतरामायणात तर प्रत्येक गीतात तर तो तो भाव अगदी ओतप्रोत(म्हणजे कूट कूट के) भरलेला आहे- मूलबाळ नसल्याने वेलींवरची फुलं बघून काळीज करपून जावे अशा चमत्कारिक मनस्थितीत असणारी कौसल्या असो अथवा सावलीतही दिसणारे रामाचे सौष्ठव बघून जिच्या बालीश नयनांत लज्जेला जागृती आली अशी नवविवाहिता सीता असो, रामकथा अगदी भावपूर्ण होऊन पुढे सरकत असते. सीतेच्या स्वयंवरात रामाने शिवधनुष्य तोडल्यावर रामाला वरमाला घालण्यासाठी निघालेल्या सीतेचे वर्णन करताना गदिमा म्हणतात, ‘अधिर चाल ती, अधिर तीहुनी हातींची माला’. आपल्या हातातील वरमाला रामाच्या गळ्यात घालावी यासाठी सीता जितकी अधीर झाली होती त्यापेक्षा अधिक अधीर झाली होती ती वरमाला कारण तिला रामाच्या गळ्यात विराजमान व्हायचे होते. हे असं सुचतंच कसं?

गीतरामायणाली गाणी आणि त्या त्या ओळी मला इतक्या आवडतात की त्या सगळ्या जागा इथे देणं शक्यच नाही. आठवणीतली गाणी वर ती गाणी शब्दार्थांसह वाचू किंवा ऐकू शकता. सुधीर फडक्यांनी ती अप्रतिम गायलीत. त्यांनी गायलेली गाणी मला इतकी आवडली की मी दुसऱ्या गायकांनी गायलेली renditions ऐकलीच नाहीत.

गंगा यमुनेच्या परिसरात रामकृष्ण जसे पूजले जातात, तसे इतर ठिकाणी नाही जात असे मला वाटते. अर्थात हे मत चुकीचे असू शकते. पण मला वाटतं रामकृष्ण ही खूप देवघरात पुजली जाणारी दैवतं नसावीत. अर्थात महाराष्ट्रात देवघरात बालकृष्ण असतो, रामनामस्मरण असते, आणि वैष्णव व भागवत धर्म/ पंथामुळे विठ्ठलासारखी दैवते आहेतच.

याशिवाय इतर काही बारकावे आहेतच. पण थोडक्यात. म्हणजे स्त्रिया जेव्हा पुरुषांना काही आग्रहाने मागत असतात त्यावेळी त्या त्यांच्या पराक्रमावर जोर देतात… उदाहरण म्हणजे कांचनमृगासाठी हट्ट करताना सीता रामाला रंक वनीचा न म्हणता अयोध्यानाथा म्हणते, शूर्पणखा रावणाला तू कुबेराला हरवले होतेस अशी आठवण करून देते. कविता लिहिताना याचे फार भान ठेवावे लागत असेल. त्याशिवाय वाचकाला भाव ओतप्रोत भरल्याचे समाधान मिळाले नसते. असो. सुधीर फडके गाताना एकदा ‘स्वयें श्रीरामप्रभू ऐकती’ तर लगेचच ‘स्वयें श्री रामप्रभू ऐकती’ असे म्हणतात. ते अर्थातच जाणूनबुजून असावे. मराठी साहित्यात असे भेद आहेत. उदाहरण म्हणजे बालकवींनी फुलराणी मध्ये ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’ असे म्हटलंय कि ‘हिरवे हिरवेगार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’ असे म्हटलंय यावर मतभेद असल्याचे एका पुस्तकात वाचलेले आठवते. असो.

*Probably, you are more familiar with रावणाच्या धा तोंडाची मुनशीपाल्टी झाल्याली https://youtu.be/SAqwGsTsB1w

हिरवे कौतुक

पहिल्या तृणपात्याचा सत्कार करताना पाडगांवकर म्हणतात:

आणि भूमीचे कवच अचानक
भेदून आले हिरवे कौतुक

I love that expression: हिरवे कौतुक

****

Anyway, बाल्कनीत असलेल्या कुंडीत अशी किती झाडे लावणार?
पण मीही काही कमी नाही. आंब्याची कोय फेकून देण्यापेक्षा मी कुंडीत लावतो. मागच्या वर्षी अशी काही जगलेली रोपं मी टेकडीवर नेवून लावली होती. अशा वेळी कलमी आंब्याची कोय लावली तर त्याला आंबे येतील कि नाही असा विचार मी करतच नाही.
आताही काही रोपं आलीत.
आंब्याचे रोप एकदम रात्रीतून वर येतं असा आजवरचा अनुभव. अर्थातच आपलं लक्ष नसतं. पण अघितलं तर अचानक एके दिवशी अंकूर जमिनीतून ३-४ इंच वर आलेला दिसतो. म्हणून या वेळी जरा लक्ष ठेवून होतो. त्यातले एक रोप कोय तिरकी रोवल्याने जरा तिरकं बाहेर आलं. आणि मी ते उपटून दुसऱ्या कुंडीत सरळ खोचून लावताना त्यांचं मूळ तुटलं. बघू जगतेय का.

 

This is the latest one to germinate.

IMG_20180406_182252

 

Well, one of them is a mango. Can you guess which is the one on the upper left with those tiny leaves starting to show?

IMG_20180406_182154

****

And the just germinating one below is the one which I plucked and planted in another pot a couple of days after I clicked this photo. If you notice in case of the other one, there are three different places where the mango stone had sprouted. Or is it four?  Only one is alive of course. Others were damaged by a bird which was caught unawares and at one point there were two growing- one of which I cut to prefer the other one. Sad but well…IMG_20180331_142728

And pasted below is another image of the one I replanted. Hopefully it will survive. It seems to be growing, but I guess that is just stored energy. Will know in a week or so, I guess. So anxious.

IMG_20180406_182221

 

Superheroines

Ok. I saw Wonder Woman. Gal Gadot is good but I guess there was too much hype.

I don’t have much against superhero comics. I have not read much in that area. I have seen some movies. And I liked the first two Spiderman movies. And Batman movies were good, too.

One thing is probably the villains. Joker- as played by Heath Ledger- was good. But many villains are over the top.

But for actresses superhero and sci-fi movies seems a sure way to get a huge fan following. (Don’t let Kate Winslet tell you anything different.) Think about it. Natalie Portman, Jennifer Lawrence, Sigourney Weaver, Anne Hathaway may have been famous before but these kind of movies helped them. I don’t know if guys have what can be called Ultimate Male Fantasies (the upside down kiss comes to mind) and if they do whether it plays a part in the whole affair. But women are more independent and they aren’t objectified a lot in these kind of movies.* It was even lesser in Wonder Woman, I guess. So probably women, too, like these movies. And she wears a party dress with a sword as an accessory. Who wouldn’t like that? Of course, generalization of this sort are not good, but, well it’s something to think about.

*They are, but it is kind of more indirect or subtle.

%d bloggers like this: