पुलकित

पुलं जाऊन आता बरीच वर्षे झाली. डेक्कनच्या प्रयाग हॉस्पिटलमध्ये घेतलेलं त्यांचे दर्शन आठवतं, पण ते शेवटचं दर्शन असं कधी वाटलं नाही. अर्थात, दर्शन हा शब्दही जरा विचित्र वाटावा, असं आता वय झालंय. आणि वाचन, अनुभवांच्या, जाणिवांच्या कक्षा जरा रुंदावल्यामुळे असेल, पुलंच्या मर्यादाही लक्षात आल्या. त्यामुळे कदाचित भक्तिभाव जरा कमी झाला असेल, पण अजूनही एखाद्या लेखकाच्या ठायी जास्तीत जास्त भक्तिभाव जर कुठे असेल तर तो खात्रीने पुलंच्या बाबतीत आहे. त्यात थोडाफार हातभार थोड्या वेगळ्या पद्धतीने या विस्तारलेल्या जाणिवांचा पण आहेच. एका बाजूने तो बाळबोधपणा निघून गेला ते बरंच झालं. अडचण एक आहे की हे दुसऱ्यांना नीट समजून सांगता येत नाही. आणि विचार केला तर आश्चर्य असे वाटते की या सगळ्या मर्यादा लक्षात येऊनही पुलं एवढे आवडत राहिले आणि आता जवळजवळ खात्री आहे की ते इथून पुढेही आवडत राहतील.

पुलं काही जगातले सर्वश्रेष्ठ लेखक नव्हते. अगदी विनोदी लेखक म्हणूनही. पण ते माझे सगळ्यात जास्त आवडते लेखक आहेत. त्यांचे निरीक्षण, विसंगती बघण्याची किंवा त्यातून विनोद करण्याची त्यांची खुबी, निरीक्षण मांडण्याची पद्धत, गरज नाही अशा ठिकाणी थोडं पुढे जाऊन केलेले विनोद, काल्पनिक आणि वास्तव व्यक्तिरेखा रेखाटतानाचे त्याचे skill, त्यांचे presentation skills, मराठीमध्ये रुजलेला पण त्यामुळे बंधनात अडकलेला त्यांचा विनोद, इत्यादी परीक्षण आपल्याला काही नवे नाही.

Anyway, 12 जूनच्या त्यांच्या official पुण्यतिथीनिमित्त, रावसाहेबांना त्यांनी वाहिलेली श्रद्धांजली आज पुलंसाठी:

‘रावसाहेब गेल्याला आज सव्वीसेक वर्षे होत आली. मधूनच रेडिओवरच्या सतारीवर काहीतरी झंकारतं, पर्युत्सुक करणारा एक जुना स्नेहगंध दरवळायला लागतो. त्यांच्या त्या लेडी सितारिस्टची आठवण येते. हसूही येतं, रडूही येतं. देवाने आमची लहानशी जीवनं समृद्ध करायला दिलेल्या या मोलाच्या देणग्या! न मागता दिल्या होत्या, न सांगता परत नेल्या.

Chintoo_PuLa

Advertisements

पावन अपुलें चरित्र वीरा, सांगुं देत मज देव अप्सरा

पुलंनी एके ठिकाणी लिहिलंय: ‘(वसिष्ठ असे म्हणाले आणि) राम हसला. म्हणून लक्ष्मण हसला.’ *

मला इतक्या सहजपणे (म्हणून या एका शब्दात) कचरा करता नाही आला तरी मजा म्हणून प्रयत्न करायचे सोडले नाही. (https://atulatul.wordpress.com/2007/05/27/the-mahabharata-the-pandavas-and-mr-ravana/)

पण या post मध्ये विनोद जरा बाजूला ठेवू. मला रामायण कथा नीट माहीत नाही. पण त्यावर रचलेले तुलसीदासाचे रामचरितमानस रेडिओवर लहानपणी ऐकलेले आठवते. शब्द नाही आठवत पण ती लय, ते सूर कानात किंवा मनात घर करून बसलेत. त्यामुळे हम आपकें हैं कौन मध्ये बरणी फोडणारा अनुपम खेर जेव्हा पोथीत डोकं घालून वाचतो तेव्हा ते सूर ओळखीचे वाटतात.

तसं बघितलं तर रामायणाभोवती भक्तीभावाचे एक वलय किंवा वातावरण आहे. महाभारताभोवती ते तितकंसं नाही. नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल, कारण भागवतधर्म भक्तीमार्गापासून दूर नाही. पण राम हा मर्यादापुरुषोत्तम असल्याने जरा सिरिअस वाटतो. त्यामानाने कृष्ण जितका गंभीर तितकाच खेळकर वाटतो. कृष्ण आपला मित्र वाटतो, राधा मीरेला तो सखा प्रियकर वाटतो, तसा राम वाटत नसावा. आईचा मार खाल्ला म्हणून भोकांड पसरून रडणाऱ्या कृष्णाचं रडणं कधी खरं तर कधी नाटकी वाटू शकते, राम चंद्रासाठी हट्ट करू शकतो हे एकवेळ शक्य वाटते, पण रामाला कौसल्या खोटं का होईना मारत असेल असं चित्र डोळ्यासमोर येतंच नाही. राम त्या थोरलेपणाच्या बाहेर सहसा येत नाही आणि कृष्ण जागोजागी आपण एक शेंडेफळ असल्याचे दाखवून देतो. एकजण सगळ्या मर्यादा सांभाळून पुरुषोत्तम होतो तर दुसरा सर्व मर्यादा झुगारुन देऊन पुरूषोत्तम होतो. किती छान पात्र आहेत ही. कृष्णाच्या चरित्रातून वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रेरणा मिळतात, पण रामचरित्रातून मनात पहिल्यांदा भक्तिभाव जागतो. निदान मलातरी तसं वाटतं.

रामायणाचे माझे वाचन आणि त्यामुळे ज्ञान तसे कमी आहे. पण मी गीतरामायण किती वेळा ऐकलंय याची काही गणतीच नाही. तुलसीदास काय म्हणतो हे कळाले नाही तरी त्याच्या रामचरितात एक गोडवा आहे. (Youtube वर रामचरित मानस all India radio शोधा, लताचं.) आणि सुधीर फडके आणि गदिमांच्या गीतरामायणात तर प्रत्येक गीतात तर तो तो भाव अगदी ओतप्रोत(म्हणजे कूट कूट के) भरलेला आहे- मूलबाळ नसल्याने वेलींवरची फुलं बघून काळीज करपून जावे अशा चमत्कारिक मनस्थितीत असणारी कौसल्या असो अथवा सावलीतही दिसणारे रामाचे सौष्ठव बघून जिच्या बालीश नयनांत लज्जेला जागृती आली अशी नवविवाहिता सीता असो, रामकथा अगदी भावपूर्ण होऊन पुढे सरकत असते. सीतेच्या स्वयंवरात रामाने शिवधनुष्य तोडल्यावर रामाला वरमाला घालण्यासाठी निघालेल्या सीतेचे वर्णन करताना गदिमा म्हणतात, ‘अधिर चाल ती, अधिर तीहुनी हातींची माला’. आपल्या हातातील वरमाला रामाच्या गळ्यात घालावी यासाठी सीता जितकी अधीर झाली होती त्यापेक्षा अधिक अधीर झाली होती ती वरमाला कारण तिला रामाच्या गळ्यात विराजमान व्हायचे होते. हे असं सुचतंच कसं?

गीतरामायणाली गाणी आणि त्या त्या ओळी मला इतक्या आवडतात की त्या सगळ्या जागा इथे देणं शक्यच नाही. आठवणीतली गाणी वर ती गाणी शब्दार्थांसह वाचू किंवा ऐकू शकता. सुधीर फडक्यांनी ती अप्रतिम गायलीत. त्यांनी गायलेली गाणी मला इतकी आवडली की मी दुसऱ्या गायकांनी गायलेली renditions ऐकलीच नाहीत.

गंगा यमुनेच्या परिसरात रामकृष्ण जसे पूजले जातात, तसे इतर ठिकाणी नाही जात असे मला वाटते. अर्थात हे मत चुकीचे असू शकते. पण मला वाटतं रामकृष्ण ही खूप देवघरात पुजली जाणारी दैवतं नसावीत. अर्थात महाराष्ट्रात देवघरात बालकृष्ण असतो, रामनामस्मरण असते, आणि वैष्णव व भागवत धर्म/ पंथामुळे विठ्ठलासारखी दैवते आहेतच.

याशिवाय इतर काही बारकावे आहेतच. पण थोडक्यात. म्हणजे स्त्रिया जेव्हा पुरुषांना काही आग्रहाने मागत असतात त्यावेळी त्या त्यांच्या पराक्रमावर जोर देतात… उदाहरण म्हणजे कांचनमृगासाठी हट्ट करताना सीता रामाला रंक वनीचा न म्हणता अयोध्यानाथा म्हणते, शूर्पणखा रावणाला तू कुबेराला हरवले होतेस अशी आठवण करून देते. कविता लिहिताना याचे फार भान ठेवावे लागत असेल. त्याशिवाय वाचकाला भाव ओतप्रोत भरल्याचे समाधान मिळाले नसते. असो. सुधीर फडके गाताना एकदा ‘स्वयें श्रीरामप्रभू ऐकती’ तर लगेचच ‘स्वयें श्री रामप्रभू ऐकती’ असे म्हणतात. ते अर्थातच जाणूनबुजून असावे. मराठी साहित्यात असे भेद आहेत. उदाहरण म्हणजे बालकवींनी फुलराणी मध्ये ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’ असे म्हटलंय कि ‘हिरवे हिरवेगार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’ असे म्हटलंय यावर मतभेद असल्याचे एका पुस्तकात वाचलेले आठवते. असो.

*Probably, you are more familiar with रावणाच्या धा तोंडाची मुनशीपाल्टी झाल्याली https://youtu.be/SAqwGsTsB1w

हिरवे कौतुक

पहिल्या तृणपात्याचा सत्कार करताना पाडगांवकर म्हणतात:

आणि भूमीचे कवच अचानक
भेदून आले हिरवे कौतुक

I love that expression: हिरवे कौतुक

****

Anyway, बाल्कनीत असलेल्या कुंडीत अशी किती झाडे लावणार?
पण मीही काही कमी नाही. आंब्याची कोय फेकून देण्यापेक्षा मी कुंडीत लावतो. मागच्या वर्षी अशी काही जगलेली रोपं मी टेकडीवर नेवून लावली होती. अशा वेळी कलमी आंब्याची कोय लावली तर त्याला आंबे येतील कि नाही असा विचार मी करतच नाही.
आताही काही रोपं आलीत.
आंब्याचे रोप एकदम रात्रीतून वर येतं असा आजवरचा अनुभव. अर्थातच आपलं लक्ष नसतं. पण अघितलं तर अचानक एके दिवशी अंकूर जमिनीतून ३-४ इंच वर आलेला दिसतो. म्हणून या वेळी जरा लक्ष ठेवून होतो. त्यातले एक रोप कोय तिरकी रोवल्याने जरा तिरकं बाहेर आलं. आणि मी ते उपटून दुसऱ्या कुंडीत सरळ खोचून लावताना त्यांचं मूळ तुटलं. बघू जगतेय का.

 

This is the latest one to germinate.

IMG_20180406_182252

 

Well, one of them is a mango. Can you guess which is the one on the upper left with those tiny leaves starting to show?

IMG_20180406_182154

****

And the just germinating one below is the one which I plucked and planted in another pot a couple of days after I clicked this photo. If you notice in case of the other one, there are three different places where the mango stone had sprouted. Or is it four?  Only one is alive of course. Others were damaged by a bird which was caught unawares and at one point there were two growing- one of which I cut to prefer the other one. Sad but well…IMG_20180331_142728

And pasted below is another image of the one I replanted. Hopefully it will survive. It seems to be growing, but I guess that is just stored energy. Will know in a week or so, I guess. So anxious.

IMG_20180406_182221

 

The first fine careless rapture!

That’s the wise thrush; he sings each song twice over,
Lest you should think he never could recapture
The first fine careless rapture!

 

-Browning

Dave Allen At Large

Probably you don’t know about this and it may interest you. Anyway, just thought of sharing.

Have you watched Dave Allen? I came across and saw a few episodes of ‘Dave Allen At Large’ on youtube a couple of years back. But did not watch it a lot.

Typically, it has a few jokes, a few sketches, something involving thieves, crime, etc. And because he was from Ireland, quite a few jokes involve drinking, catholic church, nuns, priests, etc.

When the joke telling is becoming a lost activity, because of social media although stand-ups are more available, it is good to see jokes told like that.

 

Pink Polenta

I should write less frequently I guess.

Meanwhile have fun. Alan doing accents.

 

 

How witty is the twenty pound remark!

Chintoo

A few of my all time favorites.

20050817

08-01-2005

20050917

20050806

26-03-2005

25-04-2005

26-04-2005

27-04-2005

23-12-2004

18.01.2006

23.01.2006

 

%d bloggers like this: